ताई माई अक्का, तुमचा पक्ष छक्का अस होऊ नये म्हणजे झालं…

0
120

मुंबई, दि. १ ऑगस्ट (पीसीबी) – सध्या राज्यात रोखठोक राजकारण सुरु आहे. वाकड्यात गेले तर ठोक भाषा करण्यात येत आहे. याला गाड, त्याला गाडच्या या नाऱ्याने राजकारण ढवळून निघाले आहे. आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी जशाच तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. दोन्ही पक्षांनी बाह्या वर केल्या आहेत. त्यातच संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा धरला आहे. त्यांनी अत्यंत जहरी टीका केली आहे.

माझं तोंड वाईट आहे. ताई माई अक्का, तुमचा पक्ष छक्का अस होऊ नये म्हणजे झालं, अशी जहरी टीका त्यांनी केली. पाठीत खंजीर खुपसयन्याच काम मोदी शाह यांनी केलं आहे, हे ते म्हणाले. हे औट घटकेचे सरकार आहे. नागपूरमध्ये फडणवीस यांचा पराभव होणार हे नक्की आहे. किती योजना घोषित केल्या तरी काही होणार नाही. नागपूर हा काय सातबारा आहे का त्यांच्या नावावर 7 तारखेला उद्धव ठाकरे दिल्लीत येत आहेत. मुंबईत बैठक कोणी ठरवली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सेंट्रल व्हिस्ता मोदी आणि शाह यांच्या ठेकेदारांनी ही वास्तू बनवली आहे ती खचत आहे. देशभरात त्यांच्या ठेकेदारांनी बनवलेल्या वस्तूंना अल्प काळात तडे जात आहेत. यात किती कमीशनबाजी झालीय हे दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात समृद्धी, अटल सेतू याही वस्तू आहेत. संसदेची ऐतिहासिक इमारत उभी असताना तिथं पाणी भरलं आहे. अयोध्येच्या राम मंदिराला देखील गळती लागली आहे. ठेकेदाराच्या माध्यमातून निवडणुकीसाठी पैसे घ्यायचे हा उद्योग आहे, त्यामुळेच असे चित्र दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राष्ट्रीय अस्मिता कुठे शिल्लक आहे ?

संसदेत अशी अवस्था असेल तर सदस्य आणि जनतेने प्रश्न का विचारू नयेत हा साधा सवाल आहे मुंबई पालिकेत लोकनियुक्त राज्य नसल्यामुल अवस्था काय आहे ते बघा. दिल्लीत LG कडे सगळी सत्ता आहे, केजरीवालांना तुरुंगात टाकल आहे. सभागृहात जाब विचारण्याचा अधिकार फक्त सत्ताधाऱ्यांना आहे. आम्ही त्यांना प्रश्न विचारला की आम्ही गुन्हेगार होतोय. काल सपाच्या खासदारांने संघाशी निगडीत प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी पक्षाने गोंधळ घातला, राज्यसभा सभापती यांनी काय भूमिका घेतली हे पहा असे ते म्हणाले.