तहसीलदार ज्योती देवरे यांना दहा लाखाच्या खंडणीची मागणी

0
44

खेड, दि. 30 (पीसीबी) : पुणे जिल्ह्यातील खेड तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे तुमच्या कार्यालयाने बनावट रेशनिंगकार्ड दिले असून तुम्ही मला सामाजिक कामासाठी दहा लाख रुपये द्या. मी तक्रार मागे घेतो असे म्हणून थेट तहसीलदार यांच्याकडे दहा लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी दोन व्यक्ती विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीवरून, २९ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान राजगुरूनगर तहसीलदार कार्यालयात हजर असताना सुनिल किसन नंदकर, रा. घोडेगाव यांच्या नावाने अनाधिकृत शिक्के वापरून त्यावर स्वाक्षरी केलेली आहे. त्यावरून सौ. स्नेहल महेश नेहरे या नावाने बनावट रेशनिंग कार्ड तयार असून तहसीलदार ज्योती देवरे यांना तुमच्या कार्यालयाने बनावट रेशनिंग कार्ड दिले असून तुम्ही मला सामाजिक कामासाठी दहा लाख रुपये द्या. मी तुमच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेतो. अशा आशयाचा फोनवर मेसेज पाठवून दहा लाखाची खंडणी मागितली.


या प्रकरणी अक्षय मोहन कोरपे यांनी महेश नेहरे, रा. वाडा, ता. खेड, जि. पुणे व सुनिल नंदकर, रा. घोडेगाव यांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कमल ३०८(२), ३३८, ३४०(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करत आहेत.