तळेगाव येथे भरदिवसा दोन तासात तब्ब्ल सात लाखांची घरफोडी

0
101

तळेगाव, दि. 2 ऑगस्ट (पीसीबी) – तळेगाव दाभाडे येथे भर दिवसा अवघ्या दोन तासात घरातून तब्ब्ल सात लाखांचा ऐवज चोरून नेला आहे, ही घरफोडी बुधवारी (दि.31 जुलै) सेवाधाम हॉस्पीटल जवळ सक्सेस चेंबर येथे घडली आहे.याप्रकरणी 58 वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, यावरून अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कामानिमित्त तळेगाव दाभाडे येथील दुय्य्म निबंधक कार्यालय येथे गेल्या. यावेळी चोराने फिर्यादीच्या घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. चोराने घरातून 6 लाख 88 हजार 750 रुपयांचे 27.55 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 5 हजार रुपयांचा कॅमेरा, 4 हजार 500 रुपये रोख असा एकूण 6 लाख 98 हजार 250 रुपयांची चोरी करून पसारझाला. यावरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.