तळेगाव मधून पिस्तूल जप्त

0
57

तळेगाव, दि. 17 : तळेगाव दाभाडे पोलिसांनी एका तरुणाकडून पिस्तूल जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी (दि. 15) रात्री दहा वाजताच्या सुमारास जुन्या पुणे मुंबई महामार्गावर मीनाक्षी हॉटेल समोर करण्यात आली.

आकाश गणेश चव्हाण (वय 24, रा. तळेगाव स्टेशन) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुधाकर केंद्रे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलिसांना जुन्या पुणे मुंबई महामार्गावर मीनाक्षी हॉटेल समोर एका तरुणाकडे बेकायदेशीर पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी तीस हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त करत तरुणाला अटक केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.