तळेगाव मधील शाळेच्या प्राचार्यांवर राष्ट्रीय कामात अडथळा केल्याचा गुन्हानिवडणूक विभागाच्या आदेशाला धुडकावल्याने कारवाई

0
66

तळेगाव, दि. 07 (पीसीबी) : तळेगाव दाभाडे येथील माउंट सेंट ऍन हायस्कूलच्या प्राचार्यांवर राष्ट्रीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. निवडणूक विभागाने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षणाबाबत आदेश दिले असताना प्राचार्यांनी त्यास नकार दिला. याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. हा प्रकार 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत घडला.

मंडळ अधिकारी लिंबराज सलगर यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक कालावधीमध्ये मावळ विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माउंट सेंट ऍन हायस्कूलच्या प्राचार्यांना वेळोवेळी प्रशिक्षणाबाबत आदेश दिले होते. असे असताना प्राचार्यांनी हे आदेश स्वीकारण्यास नकार दिला. याबाबत निवडणुकीसारख्या राष्ट्रीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.