तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष ॲड. विश्वनाथ दाभाडे यांचे निधन

0
439

तळेगाव , दि. ९ (पीसीबी) – भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष,अनेक संस्थांचे मार्गदर्शक ॲड विश्वनाथ जयवंतराव दाभाडे (वय 69) यांचे काल शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, चार भाऊ, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
ॲड विश्वनाथ दाभाडे हे संघ स्वयंसेवक होते. त्यांनी सन 1987 ते 1989 या कालावधीत तळेगाव दाभाडे शहराचे नगराध्यक्षपद भूषविले तर 1985 ते 1996 या दोन पंचवार्षिक कालावधीत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. त्यांनी हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्थेवर सल्लागार म्हणून होते.

पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस म्हणून त्यांनी दहा वर्ष काम केले. साप्ताहिक लोणावळा टाईम्स व दैनिक तरूण भारत वर्तमानपत्राचे त्यांनी सुरूवातीच्या काळात वार्ताहर म्हणूनही काम केले आहे.तळेगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष, हिन्दविजय नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक ॲड रविंद्र (नाना) दाभाडे, माजी सरपंच द्वारकानाथ दाभाडे, ॲड, नोटरी सुरेन्द्रनाथ दाभाडे, हिंदमाता पतसंस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ दाभाडे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

आज सकाळी अकरा वाजता बनेश्वर स्मशानभूमी तळेगाव दाभाडे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.