तळेगावात कोयता घेऊन फिरणारा अटकेत

0
341

तळेगाव दाभाडे, दि. २७ (पीसीबी) – तळेगाव दाभाडे येथे भरदिवसा हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या एकाला तळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हि कारवाई मंगळवारी (दि.26) दुपारी बाराच्या सुमारास करण्यात आली.

प्रशांत ऊर्फ परशुराम तानाजी ननावरे (वय.30 रा.तळेगाव दाभाडे, मुळ कराड) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, तळेगाव येथील निलया सोसायटीच्या बाजूला एक इसम हातात कोयता घेऊन फिरत आहे. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पोलिसांनी ननावरे याला कोयत्यासह ताब्यात घेतले.याचा पुढिल तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.