तळेगावमध्ये २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह तलावात आला आढळून

0
5

दि. २५ (पीसीबी) : तळेगाव दाभाडे येथील स्टेशन तलावात साक्षी कांतीकुमार भावर (वय २२, रा. भीमाशंकर कॉलनी, वराळे मावळ, मूळ गाव बऊर) हिचा मृतदेह पोलिसांना मिळून आला. ही घटना परिसरात खळबळ उडवणारी ठरली आहे.साक्षी काही काळापासून बेपत्ता होती. वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी मिळून शोधमोहीम राबवली. निलेश संपतराव गराडे, शुभम काकडे, गणेश गायकवाड, राजेंद्र बंडगे, राजु सय्यद आणि अनिश गराडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे साक्षीचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला.

ही आत्महत्या आहे की यामागे काही वेगळं कारण आहे, याचा तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, प्राथमिक तपास सुरू आहे. रात्री ११ वाजता वारे सर यांचा फोन आला व ११:३५ ला शोधून मुलीला पाण्याच्या बाहेर काढण्यात आले.
मुलगी संध्याकाळ पासून मिसीग होती. नातेवाईक यांनी बरेच फोन लावले होते फोन साईलेंट असल्या मुळे फक्त रींग येत होती, आवाज येत नव्हता
त्यामुळे कोनालाच काही समजले नाही.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. साक्षीच्या मृत्यूचं नेमकं कारण काय, हे पोलीस तपासाअंती स्पष्ट होईल.