तलवार बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

0
791

मोशी , दि. १ (पीसीबी) – बेकायदेशीरपणे तलवार बाळगल्या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 31) रात्री साडेआठ वाजता संतनगर चौकाजवळ मोशी प्राधिकरण येथे करण्यात आली.

अविराज भिमाशंकर घोडके (वय 21, रा. केसरजवळगा, ता. उमरगा, जि. धाराशिव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार नितीन खेसे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःजवळ तलवार हे शस्त्र बेकायदेशीरपणे बाळगले. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा लाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 350 रुपये किमतीची एक तलवार जप्त करण्यात आली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.