…तर मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, काँग्रेसच्या या खासदाराने केली मागणी

0
3

मुंबई, दि. 19 (पीसीबी) – कित्येक दिवसांपासून प्रलंबीत असलेल्या बेळगावच्या प्रश्नाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कारण आता महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधील नेते पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. दरम्यान आता महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमारेषेवर असलेल्या बेळगाववरून पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे. यावेळी काँग्रेसच्या एका आमदाराने मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश जाहीर करा अशी मागणी केली आहे.
काँग्रेस आमदाराने केली मोठी मागणी :

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमारेषेवर असलेल्या बेळगावला केंद्रशासित प्रदेश करायचं असेल तर मुंबईला देखील केंद्रशासित प्रदेश जाहीर करा अशी थेट मागणी कर्नाटकमध्ये राहणाऱ्या अथनी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी यांनी केली आहे.

यावेळी लक्ष्मण सवदी यांनी थेट मुंबईवर देखील आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे आता काँग्रेस आमदाराच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील विधानसभेतील वातावरण देखील तापण्याची चिन्हं दिसत आहेत. कारण सध्या नागपूरमध्ये महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. तसेच बेळगावमध्ये देखील सुवर्ण विधानसभेत कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. मात्र या अधिवेशनात उत्तर कर्नाटक राज्यातील समस्या आणि विकासावर चर्चा सुरू असतानाच आता काँग्रेस आमदाराने ही धक्कादायक मागणी केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रातील नेत्यांवर आमदार लक्ष्मण सवदी यांनी निशाणा साधताना बेळगावचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. कारण बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा अशी मागणी महाराष्ट्रातील नेते वारंवार करत आहेत. परंतु, आम्ही देखील मुंबई प्रांताचे एक भाग आहोत, असं आमदार लक्ष्मण सवदी यांनी म्हटलं आहे.