… तर माझ्यासाठी महाविकास आघाडीचा पर्याय खुला -नाना काटे

0
102

पिंपरी, दि. २० – महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीत चिंचवडमधील अजित पवार गटाच्या नाना काटेंचं भवितव्य ठरणार आहे. बैठकीत अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे चिंचवड विधानसभेची मागणी करणार आहेत. जर ही जागा राष्ट्रवादीला न सुटता, भाजपला सुटली तर माझ्यासाठी महाविकास आघाडीचा पर्याय खुला आहे, असे माजी शहराध्यक्ष नाना काटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितल्याने खळबळ आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला ग्रीन सिग्नल दिल्याचेही त्यांनी अवर्जून नमूद केले आहे.

अजित पवारांशी माझं बोलणं झालेलं आहे, अजित पवार माझ्यासाठी बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे चिंचवड विधानसभेची मागणी करणार आहेत. दादांनी सांगितलं आपण चिंचवड विधानसभेची जागा मागणार आहोत. तू तुझ्या पध्दतीने नागरिकांशी संवाद साध, तयारी कर असं अजितदादांनी सांगितलं असल्याचं म्हटलं आहे.
ही जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना शिंदे गटाला न मिळता भाजपला मिळाली तरी मी ही निवडणूक पक्ष चिन्हावर निवडणूक लढणार आहे, मी दादांशी याबाबत बोलेन, भाजपला ही जागा मिळाली तर माझ्यासाठी इतर पक्षांची देखील पर्याय असल्याचं नाना काटे यांनी म्हटलं आहे, तर त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा सुरू असल्याच्या देखील चर्चा आहेत. तर त्या-त्या वेळी मी माझा निर्णय जाहीर करेन असं नाना काटे म्हणालेत, तर ही जागाग भाजपला सुटली तर नाना काटे शिवसेना ठाकरे गटाची मशाल हाती घेणार की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तुतारी फुंकणार हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
चिंचवडमधील अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटे शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याची शक्यता आहे. नाना काटे यांची जयंत पाटलांशी चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. म्हणूनचं की नानांनी आता आगामी विधानसभा लढण्याचा निश्चय केला आहे. अजित दादांना ही त्यांनी आता माघार नाही, असं स्पष्टपणे कळवल्याचं समजतंय. चिंचवड विधानसभेत अश्विनी जगताप विद्यमान आमदार असल्यानं ही जागा भाजपला सुटणार हे उघड आहे. त्यामुळे नाना काटे तुतारी फुंकण्याची शक्यता आहे. तूर्तास नाना या शक्यता नाकारत आहेत, मात्र जागा घड्याळाला सुटली नाही तरी मी चिन्हावरचं ही निवडणूक लढणार असं म्हणत नानांनी संभ्रमावस्था वाढवलेली आहे.
महायुतीच्या जागावाटपात चिंचवड महायुतीची जागा भाजपला, तर महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार यांच्या पक्षाला जाईल अशी दाट शक्यता आहे, तर या मतदारसंघातून तीव्र इच्छुक असणाऱ्या नाना काटे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.