… तर भाजपच्या सगळ्या सीट पाडा – मनोज जरांगे पाटील

0
193

पुणे, २४ जुलै (पीसीबी) – पुणे येथील प्रकरणात मी कोणाची फसवणूक केली नाही. त्यानंतर मला जेलमध्ये टाकण्यात येणार आहे. दरकेर आणि देवेंद्र फडणवीस यांचे हे अभियान आहे. मला गोळ्या घालून मारण्यात येईल. मी मरण्यास तयार आहे. मी मोठे झाल्यामुळे माझ्यावर केस टाकली. उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांने हे काम केले आहे. त्याचे ते नाटक आहे. परंतु मला कारागृहात पाठवले तर भाजपचे एक सीट निवडून येऊ द्यायचे नाही. त्यांनी मला जेलमध्ये मारले तर तुम्ही जिवंत आहे तो पर्यंत भाजपला निवडून येऊ देऊ नका, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांकडून लाठीमार झाला होता, त्यामधील त्यावेळी जखमी झालेल्या महिला आणि गावातील महिला यांच्या हस्ते जरांगे पाटील उपोषण सोडले.

फडणवीस भाजपला लागलेली कीड- जरांगे
मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. पुण्यातील नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणात दाखल खटल्यात मनोज जरांगे- पाटील हजर राहिले नाही. त्यामुळे हे वॉरंट काढले आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. फडणवीस, दरेकर ही भाजपला लागलेली कीड आहे. त्यांच्या चांगलाच फटका भाजपला बसणार आहे. मला थोडे नीट होऊ देऊ मग मी पाहतो. दरेकर म्हणजे तमाशातील मावशी आहे. तिचा आवाज मंजुळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक समुद्रात करणार होते. परंतु त्यांनी एक वीट उभी केली नाही, अशी टीका त्यांनी केली. उपोषण स्थगित करत असल्याचे त्यांनी सांगितले.

मनोज जरांगे यांना आव्हान, उमेदवार उभे कराच
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्या हल्ल्यास उत्तर दिले. ते म्हणाले की, आमचे बंधू मनोजदादा यांनी दरेकरांवर शिवराळ भाषेत टीका केली. त्यांनी आज सगळ्या सीमा पार केल्या. मनोजदादांना सांगू इच्छितो, जर पडायचे आहे तर त्यांनीही 288 उमेदवार उभे करा, आम्हीही बघू कसे पाडता. प्रत्येकाचे रक्त लाल असते. आम्ही मराठे आहोत का त्याचे सर्टिफिकेट आम्हाला तुमच्याकडून नको आहे. आम्ही तुमच्या सत्य परिस्थितीवर बोललो तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही.