‘…तर कोणालाही सोडणार नाही’, भर सभागृहातून एकनाथ शिंदेंचा इशारा

0
67

दि . ७ ( पीसीबी ) – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानपरिषदेत भाषण केले. यावेळी बोलताना शिंदे यांनी राज्यात महिलांवरील अत्याचार आणि महापुरुषांबद्दल सुरू असलेल्या वक्तव्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत अवमान करणाऱ्यांना सोडणार नाही. असा थेट इशारा भर सभागृहातून दिला. शिंदेंच्या या इशाऱ्यानंतर विधान परिषदेतील सदस्यांनी टाळ्या वाजवत त्यांच्या वक्तव्याचे स्वागत केले. 

शिंदेंचा थेट इशारा….

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज या महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना सोडणार नाही. अबू आझम असो, प्रशांत कोरटकर किंवा राहुल सोलापूरकर यांना देखील सोडणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळातून थेट इशारा दिला आहे. त्यावेळी, इतर सदस्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. तसेच, बीडमध्ये जे कौर्य झालं हे आपण पाहिलं, ही विकृती आपण ठेचून काढली पाहिजे, अशा लोकांना जेरबंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. बदलापूर, स्वारगेट घटना घडल्या, लाडक्या बहिणींवर नराधम अन्याय करत आहेत, त्यांना कुणालाही सोडलं जाणार नाही. बदलापूरला जि कारवाई झाली ती सर्वांनी पहिली होती, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी आरोपींना इशारा दिला. तसेच यावेळी शिंदेंनी विरोधकांवरही टीकास्त्र सोडले. इतकेच नव्हे तर  शायराना अंदाज दाखवत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. 

…तर विरोधकांची कॅसेट अडकलीय

उद्योग बाहेर गेलेत याच्यात विरोधकांची कॅसेट अडकलीय. फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आमची दमदार सुरुवात झाली. दुप्पट वेगानं आम्ही काम करत आहोत. 

गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात परतीय गुंतवणूक देखील वाढली आहे. गेल्या दोनवेळा मी दोवासमध्ये साडे सात लाख कोटींचे करार केले आहेत, आणि आता 15 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यात आलीय. सब्र का फल मिठा होता है. दीड ट्रीलियन गुंतवणूक फक्त एमएमआर रिजनमध्ये आहे. असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 

उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका 

 2019 ला सत्तेसाठी कोणी काय काय केलं सर्वांना माहीत आहे. वडिलांची छत्रछाया सोडून शत्रूशी हात मिळवणी केली. काही नेते टुरिस्ट म्हणून येतात आणि जातात, पायऱ्यांवर चॅनेलचा बूम बघून धूम ठोकतात, असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. 

तसेच, फितरत हमारी सहन करने की न होती, तो हिंमत आपकी बोलने की ना होती.. अशी शायरी देखील एकनाथ शिंदेंनी यावेळी बोलून दाखवली. 

एकनाथ शिंदेंची महत्त्वाची माहिती

सिंचन प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही त्यांच्यामागे उभे राहिलो. पायाभूत सुविधांसाठी 700 किलो मिटरचे रस्ते दोन टप्प्यात सुरू आहेत. विरोधकांनी मेट्रो, कारशेडला विरोध केला. पण, 15 ते 20 लाख लोकं मेट्रोने प्रवास करणार आहेत. मी मुख्यमंत्री असताना गिरणी कामगारांना 3-4 टप्प्यात 4 हजार घरं दिली.

परवडणारी घरं… महिलांसाठी घरं… विद्यार्थी यांच्यासाठी हॉस्टेल हे सर्व गिरणी कामगारांसाठी सुरू आहे. मुंबईतील डब्बेवाल्यांसाठी देखील हे सगळं सुरू करत आहोत, अशी माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली.