…तर कर्नाटकात योगी मॉडेल लागू कऱण्याचा मुख्यमंत्री बोम्मईंचा इशारा

0
300

बंगळुरु, दि. २८ (पीसीबी) : कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून जातीयवादी घटनांमध्ये वाढ झाली असून, अशा प्रकारच्या घटनांना वेळ पडल्यास आळा घालण्यासाठी योगी मॉडेल लागू केले जाईल असे विधान केले आहे. योगी आदित्यनाथ राज्यातील परिस्थितीच्या आधारावर उपाययोजना आखत आहेत. त्यामुळे कर्नाटकातदेखील तशा पद्धतीची गरज भासल्यास योगी मॉडेलचा अवलंब करावा लागेल. बोम्मई सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, केंद्र सरकारला संघटनेवर बंदी घालावी लागली. याबाबत राज्य सरकारने सर्व आवश्यक अहवाल केंद्राला पाठवले असून, लवकरच केंद्र या संस्थेवर बंदी घालण्याबाबत निर्देश जारी करेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रवीण नेट्टारे यांच्या हत्येबाबत बोम्मई बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारने अशा घटनांवर कारवाई सुरू केली असून, हर्ष प्रकरणात २४ तासांत कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. केजी हल्ली आणि डीजे हल्ली दंगल प्रकरणातही अशीच कारवाई सुरू झाली होती असे ते म्हणाले. घडणाऱ्या या घटनांवर बोलण्याऐवजी आम्ही कारवाई करण्यावर भर देऊ असे ते म्हणाले. सरकार कोणत्याही संघटित गुन्हेगारीला जातीय सलोखा बिघडवू देणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.