…तर अजित पवार मुख्यमंत्री होतील, भाजपच्या बड्या नेत्याचे मत

0
325

पुणे, दि. १२ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेना आणि भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. त्यानंतर अनेक आमदारांनी आपला पाठिंबा अजित पवार यांना जाहीर केला. तर राज्यातील इतर नेत्यांनी अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदासाठी भाजप-शिवसेना यांच्यासोबत महायुतीत प्रवेश केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या.

भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे अजित पवारांनी भाजपाला समर्थन दिलं आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेकदा माध्यमांसमोर बोलताना केला आहे. चव्हाण यांच्या दाव्यानंतर भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला आहे. त्यामुळे अजित पवार भाजपाबरोबर गेले, या पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याबद्दल करण्यात आलेल्या प्रश्नावर भाजपाचे माजी खासदार संजय काकडे म्हणाले कि, “अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाबाबतची महत्त्वाकांक्षा कोणापासूनही लपलेली नाही. अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, हे जगजाहीरच आहे. त्यामुळे अजित पवारांच्या वरिष्ठांशी वाटाघाटी झाल्या असतील, तर ते मुख्यमंत्री होतील, असं काकडे म्हणाले आहेत.