तरुणीसमोर अश्लील चाळे करणाऱ्यावर गुन्हा दाखल

0
432

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – रस्त्याने जाणाऱ्या तरुणीला पाहून अश्लील चाळे केले. तसेच तिच्याकडे शारीरिक संबंधाबाबत मागणी करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार सोमवारी (दि. 26) दुपारी वल्लभनगर पिंपरी ते संत तुकाराम नगर पिंपरी या दरम्यानच्या रस्त्यावर घडला.

याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रस्त्याने जात असताना आरोपी दुचाकीवरून आला. त्याने फिर्यादीला आवाज देऊन त्यांच्यासमोर अश्लील चाळे केले. फिर्यादीने दुर्लक्ष केले असता तो पुन्हा समोर येऊन अश्लील चाळे करू लागला. त्यानंतर फिर्यादी घाबरून जात असताना त्याने फिर्यादीजवळ येऊन शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. फिर्यादीने त्याच्याकडे रागाने पाहिले असता तो दुचाकीवरून संत तुकाराम नगरच्या दिशेने निघून गेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.