तरुणीशी गैरवर्तन करणाऱ्या तरुणाला अटक

0
178

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – घरी जाणाऱ्या तरुणीला अडवून तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या रोड रोमियोला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.ही कारवाई रविवारी (दि.28) पिंपरीतील अजमेरा कॉलनी येथे घडला आहे.

याप्रकरणी तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी अक्षय हुलावळ (वय 20 रा. पिंपरी) याला अठक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या किराणा सामान घेवून घरी जात असताना आरोपींने त्यांचा पाठलाग केला व त्यांना अडवून त्यांच्याशी गैरवर्तन केले. तसेच लगट करण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीने विरोध केला असता आरोपीने त्यांचा अपमान केला. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.