तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

0
314

पुणे,दि.२९ (पीसीबी)- तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर जबरदस्तीने शरीर संबंध ठेवणारा तसेच तिचे अश्लिल व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले आहे.

अरफाज अरिफ शेख असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. त्याची सध्या पोलीस मुख्यालयातील डी कंपनीत नेमणूक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा ( गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध वेगवेगळ्या लॉजवर ऊन तेथे तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. तिच्या नकळत अश्लिल व्हिडिओ बनविले. तिने लग्नाविषयी वारंवार विचारले असता काय करायचे ते कर, जास्त मागे लागली तर तुझे व्हिडिओ कोठे पाठवितो ते बघ,असे बोलून त्याने फिर्यादी तरुणीला धमकी दिली होती.

अरफाज शेख याचे वर्तन हे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणारी व शिस्तीत बाधा करणारी असल्याने पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी त्याला निलंबित केले आहे.