तरुणीला लग्नाची मागणी घालून विनयभंग करणाऱ्या तरुणाला अटक

0
260

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – तरुणीचा पाठलाग करत तिच्याकडे लग्नाची मागणी घातली, तिने नकार दिला असता धमकीदेत तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. संबंधीत तरुणा हा पीडितेला एप्रिल 2023 पासून त्रास देत होता.

पीडीतेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी यावरून कृष्णा हनुंमत पुजारी (नय 27 रा. काळेवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्या कामाला पायी जात असताना आरोपीने फिर्यादीचा पाठलाग करून त्यांना आडवले व लग्नाची मागणी घातली. यावेळी फिर्यादी यांनी नकार दिला. या रागातून फिर्यादी यांचा आरोपीने विनयभंग केला. तसेच 10 ऑक्टोबर रोजी फिर्यादी यांच्या अम्बुलन्सवर दगड मारून धमकी दिली. यावरून पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.