दापोडी, दि.२२(पीसीबी) – तरुणीचा पाठलाग करुन तिच्याकडे फोन नंबर मागण्याचा तगादा लावणाऱ्या, तसेच तिच्या वडिलांनाही शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. हि घटना शनिवारी (दि.20) रोजी दापोडी येथे घडली आहे.
याप्रकऱणी पीडितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी प्रदिप काटे (वय 25 ते 30 रा. दापोडी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा दुचाकीवरून फिर्यादीचा पाठलाग करत होता. त्याने फिर्यादीला अडवून दोन तीनवेळा मोबाईल नंबर देखील मागितला होता. फिर्यादीने देण्यास नकार दिला असता त्याने आरडा-ओरड करत तरुणीचा विनयभंग केला. त्यानंतर आरोपी फिर्यादीच्या घराजवळ जाऊन तेथेही त्याने तोच त्रास दिला. हा सारा प्रकार पीडितेने तिच्या वडिलांना सांगितला अशता वडील आरोपीला समजावत असताना आरोपीने पीडितेच्या वडिलांना शिवीगाळ करत धमकी दिली. यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.











































