तरुणीच्या मृत्युला जबाबदार संजय राठोडला मंत्रीपद दिल्याने चित्रा वाघ संतापल्या

0
331

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ”पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. लडेंगे….जितेंगे,” असे ट्विट करत वाघ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

त्यासोबतच त्यांनी @CMOMaharashtra लाही हे टॅग केले आहे.
हेमंत देसाई यांनीही राठोड यांच्या मंत्रीपदावर नाराजी व्यक्त केली आहे. ” ज्या संजय राठोड यांच्यावर देवेंद्रजी, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ प्रभृतींनी सडकून टीका केली होती आणि त्यांचा ठाकरे सरकारमधून राजीनामा मागितला होता, ते राठोड आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री बनले आहेत. नवनिष्कलंक संजय राठोड आणि संस्कारी पक्षाचा विजय असो,” असा टोला त्यांनी लगावला आहे.

राठोड प्रकऱणावर मुख्यमंत्री म्हणाले…
महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चीट दिली होती, त्यामुळे त्यांना स्थान देण्यात आलं आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कोणाचं काही म्हणणं असेल तर ते ऐकून घेतलं जाईल असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.