तरुणीच्‍या नावावर कर्ज काढून फसवणूक

0
186

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) वाकड,

गुन्‍हा दाखल केल्‍याचे सांगत बँकेची माहिती घेत एका तरुणीच्‍या नावावर २० लाखांचे कर्ज काढत तिची फसवणूक केली. ही घटना ताथवडे येथे ४ जुलै २०२४ रोजी घडली.

याबाबत २८ वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि. २२) वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी मोबाइल धारक ९८३३२७५९८२ व ९८३७०२३९५० तसेच आयसीआयसीआय बँक खाते क्रमांक ३१९८०५५००१०९

याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी या घरी असताना अनोळखी व्‍यक्‍तीने फिर्यादीस फोन केला. तुम्ही पाठविलेल्‍या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडले आहेत. तुमच्या विरोधात मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्‍यात गुन्हा दाखल झाला आहे. त्‍यानंतर दुसर्‍या अनोळखी मोबाइलवरून फोन आला.आपण नारकोटेस्ट डिपार्टमेंट मधून बोलत आहे, असे सांगून स्काईप मॅसेंजर ॲपवर फिर्यादी तरुणीस स्काईपवर जॉईन करण्यास सांगितले. तसेच फिर्यादीचे नावावर दाखल झालेला गुन्हा नील करतो, असे सांगुन फिर्यादीस त्यांची स्क्रिन त्यांना शेअर करण्यास सांगितली. फिर्यादी तरुणीच्या घाबरलेल्या अवस्थेचा फायदा घेऊन आधार व बँकेची माहिती घेतली. फिर्यादीच्‍या नकळत आयसीआयसीआय. बँकेच्या मोबाइल ॲपवरुन २० लाख रुपयांचे कर्ज घेऊन त्‍या कर्जाची रक्‍कम आपल्‍या आयसीआयसीआय बँक खाते क्रमांक ३१९८०५५००१०९ या खात्यावर ट्रान्सफर करुन आर्थिक फसवणुक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.