तरुणीचे फोटो मॉर्फ केल्या प्रकरणी तरुणाला अटक

0
471

भोसरी,दि.21(पीसीबी) – एका तरुणीचे चोरून फोटो काढून त्या फोटोची मोर्फिंग केल्याप्रकरणी एका तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.21) फुगेवाडी परिसरात उघडकीस आली.

याप्रकरणी पीडित तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी साहिल युसुफ शेख वय (24 रा. दापोडी) या तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीचे नकळत चोरून फोटो काढले व ते फोटो नग्न अवस्थेतील फोटो सोबत मोर्फ करून स्वतः जवळ ठेवले. मात्र हा प्रकार फिर्यादी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत दुसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर कलम 354 व 354 (सी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.