तरुणीचे अश्लील व्हिडिओ पाठवून बदनामी

0
132

दि २६ मे (पीसीबी ) – तरुणीचे नग्न व्हिडिओ आणि फोटो तसेच मेसेज व्हाटसअपवरून पाठवून तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या बहिणीला देखील अश्लील व्हिडिओ, फोटो आणि मेसेज पाठवून तरुणीची बदनामी केली. हा प्रकार 17 मे रोजी मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे घडला.

याप्रकरणी 26 वर्षीय तरुणीने शनिवारी (दि. 26) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी तरुणीला व्हाटसअपवरून घाणेरडे मेसेज केले. तसेच तरुणीचे नग्न व्हिडिओ व फोटो तरुणीच्या व्हाटसअपवर पाठवले. फिर्यादी तरुणीच्या बहिणीच्या व्हाटसअपवर देखील व्हिडिओ, फोटो तसेच घाणेरडे मेसेज पाठवले. यातून अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी तरुणीची बदनामी केली. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तरुणीचा विनयभंग केला. याप्रकरणी तरुणीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. त्यानुसार तीन वेगवेगळ्या फोन क्रमांकांवरून अश्लील व्हिडिओ, फोटो तसेच मेसेज पाठवणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हिंजवडी पोलीस तपास करीत