तरुणीचा विनयभंग करत दिली एसिड फेकण्याची धमकी

0
493

दिघी, दि. २४ (पीसीबी) – तरुणीचा पाठलाग करत तिचा विनयभंग केला व तिने विरोध केला असता तिला थेट ऍसिड फेकण्याची धमकी देण्यात आली आहे. हा सारा प्रकार सोमवारी (दि.21) दिघी येथे घडला.

याप्रकरणी पीडीतेने दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून पोलिसांनी यश उर्फ करण संजय लोणारे (वय 19 रा.रहाटणी ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा सतत पाठलाग करत असे. फिर्यादीने त्याच्याशी लग्न करावे यासाठी त्यांनी फिर्यादीचा विनयभंग देखील केला. त्यानंतर त्याने प्रेम संबंध ठेवण्यासाठी फिर्यादी कडे मागणी केली. त्याला फिर्यादीने नकार दिला याचा राग येऊन त्याने तिला शिवीगाळ केली. या साऱ्या प्रकरणानंतर फिर्यादीच्या घरच्यांनी आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने उलट त्यांना शिवीगाळ करत फिर्यादीवर ऍसिड टाकण्याची धमकी दिली. त्याच्या या त्रासाला कंटाळून फिर्यादीने थेट पोलीस ठाण्यात जात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अद्याप आरोपीला अटक झाली नसून दिघी पोलीस पुढील तपास करत आहेत करत आहेत.