तरुणावर कटरने वार दोघांना अटक

0
70

सांगवी,दि. 08 (पीसीबी)

मित्राच्या भावाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर पेपर कटरने वार करण्यात आले. तसेच दगडाने मारून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. 6) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सृष्टी चौक पिंपळे गुरव येथे घडली.

सागर अनिल शर्मा (वय 22, रा. पिंपळे गुरव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नागेश मोहनराव लोखंडे (वय 22, रा. सांगवी), बॉलर उर्फ किरण प्रभाकर गायकवाड (वय 23, रा. पिंपळे गुरव) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर यांचा मित्र सचिन विजय सूर्यवंशी याच्या भावाला आरोपींनी मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यासाठी सागर शर्मा गेले होते. तिथे त्यांची आरोपींची बाचाबाची झाली. दरम्यान आरोपींनी पेपर कटरने सागर शर्मा यांच्या खांद्यावर, छातीवर, गालावर आणि पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. नागेश लांडगे याने दगडाने मारून सागर शर्मा यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.