तरुणाला मारहाण करत लुटमार करणाऱ्या दोघांना अटक

0
668

काळेवाडी,दि.२२ (पीसीबी) – शिवजयंतीसाठी दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला अडवून त्याला मारहाण करत लुटणाऱ्या तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.20) रात्री काळेवाडी येथे घडला आहे.

याप्रकरणी ओंकार संजय शिंदे (वय 23 रा. चिंचवड) व ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील (वय 24 रा.चिंचवड) या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी प्रतीक भारत गुंड (वय 21 रा.भोसरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रा सोबत शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी दुचाकी वरून जात होते. यावेळी आरोपी हो बुलटवरून आले व त्यांनी फिर्यादीची दुचाकी थांबवली. तसेच त्यांना आमच्याकडे काय बघताय म्हणत आरोपींनी फिर्यादीला मारहाण करत त्यांनी फिर्यादीकडील जबरदस्तीने 10 हजार रुपये व मोबाईल हिसकावून नेले..यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.