तरुणाला टोळक्याकडून मारहाण

0
380

रहाटणी, दि. २२ (पीसीबी) – दहीहंडी पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाला एकाने दारूच्या नशेत मारहाण केली. त्यांनतर त्याच्या साथीदारांनी येऊन तरुणाला आणखी मारले. ही घटना शनिवारी (दि. 20) रात्री गोडांबेकॉर्नर, रहाटणी येथे घडली.

दिपक दशरथ बनसोडे (वय 23, रा. रहाटणी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंटी कांबळे, दिपक दाखले, रोहित नायगम, ऋषिकेश माने, निखिल येवले, एक महिला (सर्व रा. नखाते नगर, रहाटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शनिवारी रात्री दहीहंडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा आरोपी दारूच्या नशेत आला. त्याने फिर्यादीस धक्काबुक्की केली. त्यांनतर त्याचे आरोपी साथीदार आले आणि त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करून मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीचे मित्र आले असता आरोपी दिपक दाखले याने दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यावर मारून जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.