तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करत गाड्यांची तोडफोड, दोघांना अटक

0
91

पिंपरी, १७ जुलै (पीसीबी) – तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लूटमार करत गाड्यांची तोडफोड कऱणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे, ही घटना मंगळवारी (दि.16) पिंपरी येथे सकाळी घडली आहे.प्रतीक धंदर व मुबारक शेख दोघे राहणार पिंपरी या दोघांना अटक केली आहे, तर त्यांचा साथीदार अमन शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी मल्लीकार्जून चंद्रशेखर साली (वय 36 रा.चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जीम करून बाहेर येवून थांबले असता आरोपी दुचाकीवरून आले. त्यांनी फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवला व हाताने मारहाण करत फिर्यादी यांच्या खिशातून 4 हजार 500 रुपये जबरदस्ती काढून घेतले. तसेच कोयत्याने फिर्यादी व इतरांच्या पार्के केलेल्या गाड्यांची तोडफोड केली. यावरून पिंपरी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.