तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

0
70

दापोडी, दि. 24 (पीसीबी) : तरुणाने दिलेल्या त्रासाला कंटाळून तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दापोडी येथे सोमवारी दुपारी घडली.

अश्विन सुधीर गायकवाड (वय 20, रा. जयभीमनगर, दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 67 वर्षीय मयत मुलीच्या आईने दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अश्विन हा फिर्यादी यांच्या 21 वर्षीय मुलीला त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गफळास घेऊन आत्महत्या केली. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.