तरुणाचा मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला अटक

0
283

भोसरी, दि. २९ (पीसीबी) – तरुणाच्या हातातून मोबाईल हिसकावून घेवून जाणाऱ्य़ा चोराला भोसरी पोलिसांनी अवघ्या एका दिवसात अटक केली आहे. ही घटना भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहा जवळ शनिवारी (दि.27) घडली होती.

भुषण प्रकाश वाघ (वय 26 रा.हिंजवडी, मुळ जळगाव) याला अटक केली आहे. याप्रकरणी आविद सनाउल अन्सारी (वय 21 रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जेवणासाठी पायी जात असताना आरोपी याने फिर्यादीच्या हातातून त्यांचा 10 हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून नेला होता. भोसरी पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा तपास करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.