तब्बल 22 हजार रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा जप्त

0
2

जालना जिल्ह्यात बनावट चलनाच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा अंबड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून तब्बल 1 लाख 22 हजार रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ही घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.