राष्ट्रवादीचा रोजगार मेळावा : शेखर काटे यांच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – स्पर्धेच्या युगामध्ये युवक-पदवीधरांना नोकरीच्या संधींसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. मात्र, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आयोजित केलेल्या रोजगार व मार्गदर्शन मेळाव्यात एकाच दिवसात तब्बल ९४१ पदवीधरांना ‘ऑन दी स्पॉट ऑफर लेटर’ मिळाले. त्यामुळे पदवीधर उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या वतीने आणि युवकचे शहराध्यक्ष शेखर काटे यांच्या पुढाकाराने भव्य रोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबीराचे उद्घाटन युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मा. विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, राजेंद्र जगताप, महिला अध्यक्ष कविताताई आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख , भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर, निलेश पांढारकर, राजू लोखंडे आणि माजी नगरसेविका माया बारणे, चंदाताई लोखंडे, सुमनताई पवळे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, महिला निरीक्षक शितलताई हगवने, युवक प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, उद्योग व्यापार अध्यक्ष श्रीकांत कदम, माजी सैनिक सेल अध्यक्ष बाबाजी खामकर, महिला संघटक पुष्पा शेळके, पिंपरी विधानसभा संघटक नारायण बहिरवाडे, बचत गट महासंघ अध्यक्ष ज्योती गोपने, सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्ष गंगा धेंडे, वर्षा शेडगे, आशा शिंदे, साफ सफाई कामगार महिला अध्यक्ष सुवर्णा निकम, वंदना कांबळे,मेधा पळशीकर, युवक कार्याध्यक्ष तुषार ताम्हणे, प्रसन्ना डांगे, प्रसाद कोलते, युवक प्रवक्ते चेतन फेंगसे, मुख्य समन्वयक युवक प्रशांत सपकाळ पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष अक्षय माचरे, चिंचवड विधानसभा युवक अध्यक्ष प्रतीक साळुंखे, भोसरी विधानसभा युवक अध्यक्ष सागर बोराटे, रामकृष्ण मोरे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज चे प्राचार्य लोबो सर, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंटचे फाउंडर रमणप्रीत सिंग, धनाजी तांबे, सुनील आडागळे आदी उपस्थित होते.
प्रा. रामकृष्ण मोरे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, प्राधिकरण, आकुर्डी येथे आयोजित रोजगार मेळाव्याला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सुमारे ४ हजार युवकांचा सहभाग…
सुमारे ४ हजार तरुणांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. २ हजार ८०० हून अधिक पदवीधर युवकांनी ऑनलाईन मुलाखतींसाठी नोंदणी केली, तर ८७६ युवकांनी प्रत्यक्ष मेळाव्यात विविध कंपन्यांकडे मुलाखती दिल्या आहेत. त्याद्वारे ९४१ पदवीधरांना तात्काळ नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली. बहुतांश उमेदवारांना ‘ऑफर लेटर’ उपलब्ध झाले आहेत. कंपनी व्यवस्थापनांकडून ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आगामी काळात होणार आहेत. विशेष म्हणजे काही उमेदवारांना तीन-तीन ऑफर भेटल्या आहेत. सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती होणार असून, त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येणार आहे.