तब्बल ३०० कोटींंची फसवणूक करणारा सहा महिन्यांपासून फरार, पोलिस हतबल

0
708

पुणे, दि. १५ (पीसीबी) : पुणे शहरातील एक, दोन नव्हे तर शेकडो उच्चशिक्षित तरुणांची फसवणूक केली. पुण्यातील आयटी कंपन्यांमधील (Pune IT City) तरुणांची फसवणूक केली गेली. यासंदर्भात सहा महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. परंतु अजूनही तो आरोपी पोलिसांना सापडला नाही. शेकडो तरुणांची फसवणूक करणार आरोपी सहा महिन्यांपासून मोकट असताना पुणे पोलीस त्याला पकडू शकले नाही. यामुळे त्या तरुणांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

पुणे शहरात अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट नावाने सेलवा नडार याने कंपनी सुरु केली. नडाय याने कोरोना काळात कोणाकोणाची कर्ज थकली त्याचा डेटा व्हेंडरकडून मिळवला. त्या डेटाचा उपयोग करण्यासाठी त्याने आपल्या कार्यालयात काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. या कर्मचाऱ्यांनी कर्ज थकलेल्या लोकांना संपर्क सुरु केला आणि तुमचे कर्ज टॉपअ‍ॅप करुन देतो, असे सांगितले. नडार याने तरुणांकडून केवायसीची कागदपत्रे घेतली. आधीचे कर्ज फेडले आणि एका व्यक्तीचे तीन, तीन बँकांकडून कर्ज काढले. एकूण 273 तरुणांची 300 कोटींत फसवणूक केली.

फसवणूक झालेला खराडीमध्ये राहणारा प्रभात रंजन याने जुलै महिन्यात जीवन संपवले. त्यावेळी त्याने नडार आणि इतर तिघांची नावे घेतली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आला. त्यानंतर या प्रकरणात नडार याच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली. परंतु सेलवा नडार अजूनही फरार आहे. त्याची पत्नी आणि मुलगाही फरार आहे. नडार विदेशात पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन लुकआउट नोटीस जारी केली.

विदेशात पळून गेल्याची शक्यता
फसवणूक झालेले सर्व जण मुख्य आरोपीला अटक होईल, या अपेक्षेवर आहे. परंतु नडार यांचा शोध अजूनही लागलेला नाही. तो विदेशात पळून गेल्याची शक्यता आहे. त्याच्या कॅनेडात राहणाऱ्या जवळच्या नातेवाईकाकडे तो असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान त्याचा आयफोन मुंबई-पुणे महामार्गावर खोपलीजवळ मिळाला होता. परंतु त्याच्यातून पोलिसांना काहीच मिळाले नाही.