तब्बल ११९९ किलो बनावट पनीर जप्त

0
292

पुणे दि. १३ (पीसीबी) – अन्न व औषध प्रशासन विभागाने गेल्या १५ दिवसात बनावट पनीर कारखान्यावर तिसरी कारवाई केली आहे. बनावट पनीर तयार करणाऱ्या कोंढवा येथील सद्गुरुकृपा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स या कारखान्यावर छापा मारत २,३९,८०० रुपये किमतीचे ११९९ किलो पनीर एफडीएने जप्त केले आहे.

यावेळी अधिकाऱ्यांनी छापा टाकून पनीरसह १८ लाख रुपये किमतीचे ४,०७३ किलो स्किम्ड मिल्क पावडर, १,५३,७६५ रुपये किमतीचे १०४८ किलो आर बी डी पामोलीन तेल असा एकूण २२ लाख ६५ हजार २१७ रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत आतापर्यंतचा बनावट पनीरचा सर्वात मोठा साठा एफडीएने जप्त केला आहे.

एफडीऐची या १५ दिवसातील ही तिसरी कारवाई आहे. यापूर्वी वानवडी येथे बनावट पनीर तयार करणाऱ्या मे टीप टॉप डेरीवर छापा टाकत ३ लाख २९ हाजार २४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता आणि पहिली कारवाई ही हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील मे. आर. एस डेअरी फार्म या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा मारत २९ हजार ४०० रपयचा किमती माल जप्त केला होता.
पण, भेसळखोरांमुळे पनीर खाणाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे नकली पनीरचा बाजार फोफावला असून अत्यंत वाईट पध्दतीने पनीर तयार केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून आवाहन केलं जात आहे की अशाप्रकारचे बनावट पनीर तुमच्या नजरेस आढळल्यास त्वरित आम्हाला संपर्क करावा.