तडीपार गुन्हेगाराला अटक, चोरीचे सहा गुन्हे उघड

0
50

– एक लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

चिंचवड, दि. 12 (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने एका तडीपार गुंडाला अटक केली. त्याच्याकडून एक दुचाकी आणि सहा मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड आणि अहमदनगर येथील सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

अभिजित सुभाष रॉय (वय २५, रा. साने चौक, चिखली. मूळ रा. पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस अंमलदार मारुती जयभाय यांना माहिती मिळाली कि, आळंदी फाटा चाकण येथे एकजण चोरीचे मोबाईल विकण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अभिजित रॉय याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्यावर यापूर्वी १९ गुन्हे दाखल आहेत. तो पिंपरी-चिंचवड मधील सराईत गुन्हेगार आहे. त्याला पोलिसांनी तडीपार देखील केले आहे.

त्याची झडती घेत त्याच्याकडून चोरीची एक दुचाकी आणि सहा मोबाईल फोन असा एकूण एक लाख ८० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. या कारवाई मध्ये पिंपरी-चिंचवड मधील चाकण, भोसरी, दिघी, चिखली आणि अहमदनगर मधील तोफखाना पोलीस ठाण्यातील एक असे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक अभिनय पवार, उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार संजय गवारे, गणेश हिंगे, जमीर तांबोळी, आशिष बनकर, विशाल गायकवाड, नितीन उमरजकर, मारुती जयभाय, मोहसीन आत्तार यांनी केली.