तडीपार गुंड आणि त्याच्या पत्नीविरोधात दारू विक्री प्रकरणी गुन्हा

0
283

पिंपरी दि. १३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केलेला गुंड तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच शहराच्या हद्दीत आला. त्याने पतीसोबत मिळून दारू विक्रीचा धंदा सुरु केला.या याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १२) दुपारी पाच वाजता च-होली खुर्द येथे करण्यात आली.

संभा नागर रजपूत (वय ५२, रा. च-होली खुर्द) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या पत्नी विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपी संभा रजपूत याला २९ मार्च २०२२ रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्यांचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो शहराच्या हद्दीत आला. त्याने आणि त्याच्या पत्नीने गावठी हातभट्टी दारूची विक्री सुरु केली. याबाबत गुन्हे शाखा युनिट तीनला माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करून संभाला अटक केली. त्याची पत्नी लघुशंकेच्या कारणाने पळून गेली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.