तडीपार गुंडास शस्‍त्रासह अटक

0
113

पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी)
तडीपारी आदेशाचा भंग करीत शहरात आलेल्‍या गुंडास पोलिसांनी शस्‍त्रासह अटक केली. ही घटना सोमाटणे फाटा येथे सोमवारी (दि. २) सायंकाळी घडली.

प्रकाश उर्फ बाळा प्रमोद शेडे (वय २८, रा. खंडोबा माळ, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि.पुणे) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार किशोर दत्तात्रय गिरीगोसावी (वय ४२) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पोलीस उपायुक्‍त यांनी आरोपी प्रकाश शेंडे याला संपूर्ण पुणे जिल्ह्यातून १० महिन्याकरीता तडीपार केले आहे. तडीपारीची मुदत संपुष्‍टात येण्‍यापूर्वी किंवा तडीपारीचा आदेश रद्द झोलेला नसतानाही कोणतीही परवानगी न घेता तो शहरात आला होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी त्‍याला अटक केली. त्‍याच्‍याकडून एक कोयताही हस्‍तगत केला. याप्रकरणी त्‍याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.