तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

0
822

देहूरोड, दि. 10 (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केलेल्या गुंडाला गुन्हे शाखा युनिट पाचने शस्त्रासह अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 9) दुपारी सव्वादोन वाजता आदर्शनगर देहूरोड येथे करण्यात आली.

अमित गजानन वानरे (वय 32, रा. आदर्शनगर, किवळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राजकुमार इघारे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अमित वानरे याला पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आला. याबाबत गुन्हे शाखेला माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.