तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

0
4751

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडाला गुन्हे शाखा युनिट दोनने शस्त्रासह अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. २१) सायंकाळी पावणे आठ वाजता अजंठानगर, चिंचवड येथे करण्यात आली.

बाबासाहेब उर्फ भैय्या हनुमंत गजरमल (वय ३२, रा. अजंठानगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार उद्धव खेडकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांना माहिती मिळाली की, अजंठानगर येथे एक व्यक्ती शस्त्र घेऊन आला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून बाबासाहेब याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे धारदार लोखंडी सत्तूर आढळून आला.

बाबासाहेब याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ६ ऑगस्ट २०२२ रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात विनापरवाना आला. तसेच त्याने स्वतःकडे हत्यार बाळगले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.