तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

0
72

निगडी, दि. 23 (पीसीबी) : पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी पार केलेल्या गुंडाला गुन्हे शाखेने शस्त्रासह अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 22) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे घडली करण्यात आली.

सुरज उर्फ तिऱ्या दत्ता मोरे (वय 22, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अजित सानप यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरज मोरे याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट दोनने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा 51 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.