तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

0
292

दि 29 मे (पीसीबी ) – पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने शस्त्रासह अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 27) रात्री दत्त नगर, चिंचवड येथे करण्यात आली.

निहाल मोहम्मद शेख (वय 25, रा. दत्तनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मयूर दळवी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निहाल याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो कोणतीही परवनगी न घेता शहरात आला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुंडा विरोधी पथकाने दत्त नगर, चिंचवड येथून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांना एक लोखंडी चॉपर आढळून आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.