तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

0
339

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ४) सायंकाळी साई चौकाजवळ पिंपरी येथे करण्यात आली.

अमन अजीम शेख (वय २२, रा. आर्य समाज चौक, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रोहित वाघमारे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमन शेख याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ५ जानेवारी २०२४ रोजी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत आला. तसेच त्याने कोयता बाळगला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पिंपरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २०० रुपये किमतीचा कोयता जप्त करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.