तडीपार गुंडाला तलवारीसह अटक

0
303

दापोडी, दि. ८ (पीसीबी) – तडीपार आरोपीला भोसरी पोलिसांनी दापोडी येथून तलवारीसह अटक केले आहे. ही कारवाई रविवारी (दि.8) दापोडी येथील रेल्वे लाईन जवळ करण्यात आली आहे.

इम्तीयाज उर्फ ताजइस्माईल शेख (वय 30 रा. दापोडी) असेअटक आरोपीचे नाव असून बोसरी पोलीस ठाण्यात सागर आनंद जाधव यांनी पोलीस ठाण्यातफिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याला पुणेजिल्हा हद्दीतून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयच्या परिमंडळ दोन यांनी 5 सप्टेंबर 2022रोजी दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो शहरात आलाहोता. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून 100 रुपयांची तलवार देखील जप्त केली आहे.