तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक

0
319

पिंपरी, दि ४ (पीसीबी)- तडीपार केलेल्या गुंडाने बेकायदेशीरपणे शहरात येऊन कोयता घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (दि. 3) पारशी चाळ, देहूरोड येथे घडली.

निखील उर्फ चिक्या भिकू वाल्मिकी (वय 25, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई मोहसीन युनुस अत्तर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखील याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी 30 डिसेंबर 2022 रोजी पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आला. त्याने कोयता घेऊन देहूरोड परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.