तडीपार गुंडाला अटक

0
287

भोसरी, दि. ३० (पीसीबी) – दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केलेला गुंड शहरात आला. त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्याने धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना सोमवारी (दि. 29) सायंकाळी दापोडी येथे घडली.

गणेश विष्णू अडागळे (वय 25, रा. बापू काटे चाळ, दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यपरकरणी पोलीस कर्मचारी सागर जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी गणेश अडागळे याला 26 एप्रिल 2022 रोजी पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. याबाबत माहिती मिळाली असता भोसरी पोलीस त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेले असता त्याने पोलिसांना ढकलून देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.