ठाणे, दि. २४. – मोक्काअंतर्गत आणि गंभीर गुन्ह्यांप्रकरणी तडीपारीची कारवाई झालेला गुंड मयूर शिंदेनं भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत शिंदेनं भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेनं कमळ हाती घेतलं आहे. तडीपार गुंडाचा भाजप प्रवेश चर्चेचा विषय ठरला आहे.
मयूर शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बॅनर काही दिवसांपूर्वी शहरात लागले होते. शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर पक्ष प्रवेशाचे बॅनर झळकले होते. गेल्या सोमवारी गुंड मयूर शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार होता. त्याचं वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’नं दिलं. यानंतर सोशल मीडियावरुन भाजपवर टीकेचा भडिमार झाला. अखेर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. आचारसंहिता जाहीर झाल्याचं कारण देण्यात आलं. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शिंदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश गुंडाळत कार्यक्रमातून काढता पाय घेतला. पण आज हा पक्ष प्रवेश झाला आहे.