तडीपार आरोपीला शस्त्रासह अटक

0
203

. थेरगाव, दि. १८ (पीबीबी) – पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या आरोपीला गुंडा विरोधी पथकाने शस्त्रासह अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 17) पहाटे पोलिसांनी केलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान करण्यात आली.

सौरभ विलास चौधरी (वय 21, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रामभाऊ मोहिते यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे पिंपरी चिंचवड पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवले. त्यात पोलिसांनी एका तरुणाला कोयता बाळगल्या प्रकरणी अटक केली. अटक केलेल्या आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी जानेवारी 2023 मध्ये एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. त्याने शहरात येऊन हत्यार बाळगले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.