तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले, तीघे बेपत्ता

0
132

मुंबई, दि. ३ – भारतीय तटरक्षक दलाच्या एका हेलिकॉप्टरचा मोठा अपघात झाला आहे. गुजरातमधील पोरबंदरजवळ अरबी समुद्रात मदतीसाठी गेलेलं हे हलिकॉप्टर समुद्रात कोसळलं आहे. या दुर्घटनेनंतर हेलिकॉप्टरचे दोन्ही पायलट व एक डायव्हर बेपत्ता आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चार जण होते. त्यापैकी एका व्यक्तीला (डायव्हर) बचाव पथकाने वाचवलं आहे. दरम्यान, अरबी समुद्रात हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहेत.