तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला धमकी

0
232

महिलेच्या मुलाला मारहाण केल्या प्रकरणी दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी आरोपीने महिलेला शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना 11 मार्च रोजी भूमकर वस्ती वाकडे येथे घडली.

संदीप बबन मुंडे (वय 38, रा. भुमकर वस्ती, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित 37 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरी असताना आरोपी कटर आणि लाकडी दांडके घेऊन आला. त्याने फिर्यादीला धक्का देत खिडकी उघडली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत शिवगाळ केली. आरोपीने फिर्यादी यांच्या मुलाला यापूर्वी मारहाण केली होती. त्याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी आरोपीने फिर्यादीवर दबाव आणून शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच फिर्यादी सोबत गैरवर्तन करत विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.